शैलेन्द्र : ‘गीतकार शैलेन्द्र ही सिनेसंगीताच्या दुनियेत घडलेली सगळ्यात चांगली गोष्ट होती. चित्रपटगीतांना शैलेंद्रने साहित्याची उंची गाठून दिली.’

शैलेन्द्र फक्त ४३ वर्षांचे आयुष्य जगले. ‘ये रात भीगी भीगी’ या गाण्यातल्या दुसऱ्या कडव्यातल्या अंतर्मुख करणाऱ्या ‘जो दिन के उजाले में न मिला, दिल ढूंढे ऐसे सपने को, इस रात की जगमग में डूबी मैं ढूंढ रही हूं अपनेको’ या ओळी ऐकल्यावर गीतकार गुलज़ारचे शब्द आठवतात- “गीतकार शैलेन्द्र ही आमच्या गीतकारांच्या दुनियेत घडलेली सगळ्यात चांगली गोष्ट होती. चित्रपटगीतांना शैलेंद्रने साहित्याची उंची गाठून दिली.”.......

‘तालिब’ या शब्दाची पवित्रता आणि शुद्धता इतकी डागाळली आहे की, गेल्या काही वर्षांपासून ‘तालिबान’ हा शब्द ‘सैतान’ या शब्दाचा समानार्थी शब्द झाला आहे

‘तलब’ म्हणजे शोध घेणे. तलबच्या मुळाशी ‘तलाब’ (तलाव) आहे. ‘तलाश’ आहे. वाळवंटात तहान भागवण्यासाठी तलावाचा शोध घेण्याचे कार्य हा शब्द दर्शवतो. ‘तलब’पासून ‘तालिब’ हा शब्द तयार झाला आहे. त्याचा अर्थ साधक, शोधक, जिज्ञासू. तालिब-ए-इल्म म्हणजे ज्ञानाचा साधक अर्थात शिष्य, विद्यार्थी, चेला, इत्यादी. पश्तूनमध्ये या ‘तालिब’चे अनेकवचन ‘तालिबान’ आहे. ‘तालिब’ या शब्दाला ‘आन’ प्रत्यय जोडून, अनेकवचन ‘तालिबान’ बनले........

‘किंग ऑफ द रॉक’ एल्विस अरोन प्रिस्लेशिवाय विसाव्या शतकातल्या संगीताला नवीन दिशा देणाऱ्या महान संगीतकारांची यादी पूर्ण होऊ शकत नाही!

एल्विसने अमेरिकन संगीताचा बाजच बदलून टाकला. त्याचा प्रभाव नंतर आलेल्या मॅडोना, जॉर्ज मायकेल, एमिनेम, जस्टीन टिंबरलेक अशा अनेक  गायकांवर पडला. ब्लूज संगीत एल्विसच्या प्रभावातून बाहेर पडू शकत नाही. ते कृष्णवर्णीयांचं, पण या गोऱ्या एल्विसने ते आपलंसं केलं. काळ्या-गोऱ्यांमधील दरी मिटवणारी व्यक्ती म्हणून एल्विसकडे पाहिलं जातं. एल्विसने या संगीताचा ताबा घेतला आणि संगीतविश्व ढवळून काढून त्यात आमूलाग्र परिवर्तन केलं.......

नय्यारा नूर यांनी कदाचित ‘त्या’ वेळेच्या आधीच थांबण्याचा निर्णय घेतला असेल… पण त्यामुळेच त्यांचा ‘दौर’ लक्षात राहण्याची जास्त शक्यता आहे

“या गाण्याच्या ओढीनेच मला माझा नवरा मिळवून दिला… शहरयार झैदी. ते आंतर-महाविद्यालयीन संगीत स्पर्धांमध्ये बऱ्याच वेळा माझे प्रतिस्पर्धी असायचे आणि नेहमी मला पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी मिळायची, तर त्यांना दुसऱ्या क्रमांकाची. ते हेली कॉलेज ऑफ कॉमर्सचे प्रतिनिधित्व करायचे. एकदा बेगम अख्तरची रेकॉर्ड शोधताना दुकानात आमची गाठ पडली. एकच रेकॉर्ड आणि आम्ही दोन गिऱ्हाईक! ‘आपण लग्न करू आणि एकच रेकॉर्ड ऐकू!’.......